मुंबई : गणेशोत्सव अवघ्या महिनाभरावर आला, आणि अचानक गणेश मुर्ती घडवणारे ते हात कायमचे शांत झाले... प्रसिद्ध गणेश मुर्तीकार विजय खातू यांचं मंगळवारी निधन झालं... पण गणेशोत्सव तोंडावर असताना तब्बल ५०० गणेश मुर्तीची जबाबदारी त्यांच्यापाठी होती.. खातू कुटुंबावरील ही जबाबदारी विजय खातू यांची मोठी मुलगी रेश्मा हिनं वडील गेल्यानंतर दुस-याच दिवशी स्वीकारली..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी बडोद्याची १७ फूट उंच मुर्ती कारखान्याबाहेर पडली. यासाठी  रेश्मा सकाळपासून रात्रीपर्यंत काम पाहते. वेळप्रसंगी ती स्वत: ते काम करते. फिल्ड मेकींगचे काम करत असलेल्या रेश्माला गणेश मूर्तीचे हे काम नवीनच. पण बाबांची मेहनत वाया जाऊ द्यायची नाही हा तिचा ध्यास ...


मुंबईसह विविध राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती तयार करण्याची जबाबदारी विजय खातू आणि त्यांच्या टीमवर असते. यात मुंबईचा राजा, तुळशीवाडी, चंदनवाडी,चिंतामणी, अशा सुप्रसिद्ध गणेश मुर्तीचा समावेश आहे.