मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत दिशा सालीयन हिच्या मृत्यूप्रकरणावरून शिवसेनेवर आरोप केले. यावरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नारायण राणे यांच्याविरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरु केलीय.     


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिशा सालीयन हिची बदनामी करण्यात आल्याबद्दल महिला आयोगाला तक्रारीचा मेल थोड्याच वेळात करणार आहे. काय कारवाई करायची हे राज्य महिला आयोगाला सांगण्याची गरज नाही. महिला आयोग योग्य ती कारवाई करेल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील 'अधिश' बंगल्यावर पालिका अधिकारी काही पहिल्यादा जात नाही. चार वर्षांपूर्वीही असे एक पथक गेले होते. काही भाग जाणवतंय त्याची पाहणी करण्यासाठी पालिका अधिकारी गेले आहेत. राणे यांच्या बंगल्यावर नियमाप्रमाणेच कारवाई सुरु आहे. महापालिका आपलं काम करत असून राणेसाहेब कारवाईला सहकार्य करतील. राणे यांच्या बंगल्यात CRZ कायद्याचं उल्लंघन झालं आहे, अशी माहिती महापौरानी दिली. 


 



 


पालिका शाळेत गीतापठण
भाजप नगरसेविका योगिता कोळी यांचा महापालिका शाळेत गीतापठण सुरु करण्याचा प्रस्ताव आमच्याकडे अद्याप आलेला नाही. गीता-कुराण हा वाद आता लहान मुलांमध्ये आणून त्याचेही राजकारण करणार आहेत का असा सवाल करतानाच कारण नसताना हिंदू मुस्लिम वाद निर्माण करू नका, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.


शिवाजी पार्कमध्ये रस्ता नाही
शिवाजी पार्क मैदानात असलेल्या विहिरीच्या पाण्याची पातळी वाढावी यासाठी येथे मड ट्रॅक टाकण्यात आला आहे. मात्र, जाणूनबाजूनं तिथे काही वेगळे वातावरण निर्माण केले जात आहे. मुख्यमंत्री यांनीही याचा आढावा घेतला आहे. शिवाजी पार्कमध्ये कुठलही रस्ता केला जाणार नाही. 2 दिवसानंतर तुम्हाला तिथे खडी दिसणार नाही,  


तर मास्कमुक्तीचा विचार करू...
मास्कमुक्तीचा निर्णय अजून घेण्यात आलेला नाही. जो पर्यंत निर्णय होत  नाही तोपर्यंत मास्क घालवाच लागेल. मार्चमध्ये यावर सविस्तर आढावा घेतला जाईल. राज्यात, मुंबईत कोरोना रुग्ण संख्या नगण्य झाली तर नक्कीच 100 टक्के मास्क मुक्तीबाबत विचार करू.