मुंबई : मुंबई पोलिस दलातील कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil)  यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद (Sharad Pawar)  पवार यांची सिल्व्हर ओक या ठिकाणी भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुर झाली आहे (Vishwas Nangare Patil meet Sharad Pawar on State Law Issue) . मिळालेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात चर्चा झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण(Pooja chavan Death Case), मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण (Mansukh Hiren Death Case) आणि मोहन डेलकर आत्महत्या (Mohan Delkar Suicide Case) प्रकरणांवरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला घेरले आहे. विधानसभेत याचे पडसाद उमटले आणि मोठा गदारोळ पाहायला मिळाला. 


पूजा चव्हाण प्रकरणात वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod)यांच्या विरोधात विरोधक आक्रमक झाले. यानंतर त्यांना मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा द्यावा लागला. मनसुख हिरेन प्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्यावरून विधानसभा चार वेळा तहकूब करण्यात आली. त्याचप्रमाणे सचिन वाझे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांची बदली करण्यात आली आहे. 


राज्यात ही परिस्थिती असताना मुंबई पोलीस दलाच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. (joint commissioner of police vishwas nangre patil meets ncp leader sharad pawar)


शरद पवार आणि विश्वास नांगरे पाटील यांच्या भेटीबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांची डेलकर, मनसुख हिरेन आणि वाझे प्रकरणावर देखील या भेटीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी याच्या घराबाहेर स्फोटके भरलेली कार पार्क करण्यात आली होती. या प्रकरणावर देखील दोघांची चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. नांगरे पाटील हे पवार यांना त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेटले. दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याचे समजते.


या भेटीत पवार यांनी डेलकर आत्महत्या प्रकरणाची चर्चा केली असावी असेही बोलले जात आहे. शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार असल्याचे समजते.