मुंबई : काचेचे पारदर्शी छत, फिरत्या खुर्च्या, हॅंगींग एलसीडी यांसारख्या अत्याधुनिक सुविधा असलेली आणि घोषणेपासूनच प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली 'विस्टाडोम कोच' ट्रेन प्रवाशांच्या सेवेत आजपासून (सोमवार, १६ सप्टेबर) रूजू झाली. केंद्रीय रेल्वेकडून सुरू करण्यात आलेली ही रेल्वे मुंबई-गोवा मार्गावर धावणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पारदर्शी विंडो सिस्टम असलेल्या या रेल्वेमधून प्रवाशांना निसर्गसौंदर्याची अनुभूती घेता येणार आहे. केंद्रीय रेल्वेचे प्रवक्ते, सुनील उदासी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, '१८ सप्टेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत रूजू झालेल्या जन शताब्दी एक्सप्रेसमध्ये दादर आणि मडगाव दरम्यान, एक विस्टाडोम (ग्लास-टॉप) कोच लावण्यात येईल. भारतीय रेल्वेमध्ये अशा पद्धतीची ही पहिलीच रेल्वे असून, ती एकमेव आहे.


या रेल्वेचे वैशिष्ट्य असे की, या विशेष डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोटेबल आसनाचा आनंद घेता येणार आहे. तसेच, हॅंगींग एलईडी पाहात मनोरंजनही करता येणार आहे. एकूण ४० आसनांच्या या कोचसाठी सुमारे ३.३८ कोटी रूपये इतका खर्च आला.


उदासी यांनी म्हटले आहे की, अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला हा कोच केंद्रीय रेल्वेने आपले मुख्यालय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (सीएसएमटी) सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात मागवला होता. या कोचने प्रवास करण्यासाठी सर्व प्रकारचे बुकींग कॉम्प्यूटराईज्ड रिजर्वेशन सेंटर्स आणि IRCTCच्या माध्यमातून सुरू आहे. उदासी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्यात ही ट्रेन आठवड्यातून २ दिवस तर, पावसाळा संपताच आठवड्यातून ५ दिवस चालवण्यात येईल. जनशताब्दी एक्सप्रेसची दादरवरून सुटण्याची वेळ सकाळी ५.२५ आहे. ही ट्रेन त्याच दिवशी दुपारी ४ वाजता मडगावला पोहोचते.


विस्टाडोम कोचची निर्मिती चेन्नईतीलव द इंटीग्रल कोच फॅक्ट्रीत बनले आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ट्विट करून या हटके ट्रेनचे फोटोही शेअर केले होते. देशातील पर्यटनास चालना देण्यासाठी ही ट्रेन सुरू करण्यात येणार असल्याचे तेव्हा प्रभूंनी म्हटले होते.