विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कोणत्या पक्षाची किती मतं फुटली? जाणून घ्या सविस्तर
विधानपरिषद निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची मतं फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे उमेदवार काठावर तर कॉंग्रेसच्या एका उमेदवाराचा पराभव झाला आहे. परंतू या निवडणुकीत कोणत्या पक्षाची किती मतं फुटली हे जाणून घेऊ या...
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची मतं फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे उमेदवार काठावर तर कॉंग्रेसच्या एका उमेदवाराचा पराभव झाला आहे. परंतू या निवडणुकीत कोणत्या पक्षाची किती मतं फुटली हे जाणून घेऊ या...
शिवसेना
अपेक्षित मत 64
शिवसेनेची मतं 55
प्रहार पक्षाची 2
गडाख 1
अपक्ष 6
आशिष जैस्वाल
गीता जैन
मंजुळा गावित
नरेंद्र भोंडेकर
राजेंद्र यद्रावकर
चंद्रकांत पाटील
शिवसेनेच्या 2 उमेदवारांनी पडलेली पडलेली मतं ही 52 इतकी आहेत. याचाच अर्थ शिवसेनेची 12 मते फुटली.
ही बातमी देखील वाचा : - महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप; एकनाथ शिंदेंसह अनेक सेना आमदार भाजपच्या संपर्कात?
काँग्रेस
अपेक्षित मत 48
कॉंग्रेसची मतं 44
अपक्ष 4
पडलेली मत 42
याचाच अर्थ विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची 6 मतं फुटली आहेत.
राष्ट्रवादी
पक्षाचे 2 आमदार तुरूंगात
पंढरपूरची जागा गमावली.
पक्षाची मते -51
विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला 56 मतं मिळाली आहेत.