मुंबई : शासनाने सध्या नियुक्त केलेली पंढरपूरची श्री विठ्ठल रखुमाई मंदिर व्यवस्थापन समिती त्वरित बरखास्त करावी, या मागणीसाठी वारकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. 
 
रविवारी १० ऑक्टोबर रोजी आझाद मैदान इथं वारकऱ्यांचं भजनी आंदोलन करत आपल्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न वारकरी करणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वारकरी संप्रदायिकांशी विचार विनिमय करून मंदिर व्यवस्थापणेसाठी नवीन समिती स्थापन करण्याची प्रक्रिया लगेच सुरू करावी, असं या वारकऱ्यांचं म्हणणं आहे. अध्यक्षांसह या समितीमध्ये केवळ वारकरी संप्रदायिकांनाच प्रतिनिधित्व मिळावे... यामध्ये राजकीय नियुक्त्या नको असं श्री वारकरी प्रबोधन महासमितीचे अध्यक्ष रामेश्वर महाराज शास्त्री यांनी म्हटलंय.