मुंबई : अजित पवार.. राजकारणाला एक वेगळं वळण देणारं वलय....आज अजित दादा विधानभवनात अवतरले तेव्हा एक वेगळंच वातावरण पाहायला मिळालं. 'वैयक्तिक गोष्टी ह्या राजकारणात येऊ नयेत... हा दादा माझा दादा आहेच... आणि राहील... असं सुप्रीया सुळेंनी माध्यमासमोर म्हटलं... अनेक कॅमेऱ्यांमध्ये सुप्रीया सुळे आणि अजित पवार यांची गळाभेटही कैद झाली... परंतु, या गळाभेटीसाठी पुढाकार कुणी घेतला... सुप्रीया सुळे यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसलं, तसं अजित दादांच्या चेहऱ्यावर का नव्हतं? असे प्रश्न अनेकांना पडले.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सगळ्यांच्याच नजरा आज विधानसभेतल्या शपथविधीबरोबरच खिळून होत्या त्या अजित पवारांच्या येण्याकडे... दादांनी विधानभवनाजवळ येताच योगायोग म्हणावा तर जयंत पाटील आणि अजित दादांच्या गाड्या एकमागोमाग आल्या... जयंत पाटील दादांना पाहून थांबलेही... मात्र, इथेही अजित दादांनी जयंत पाटलांना पाहून डायलॉगबाजी केलीच. 'तुम्ही मला विसरला... म्हणून मी उशिरा उठलेो... तुम्ही आलाच नाहीत' असं त्यांनी जयंत पाटलांना म्हटलेलं कॅमेऱ्यातही कैद झालं.  


यानंतर, सुप्रियांनी अजित दादांची गळाभेट घेतली... त्या अजित दादांच्या पाया पडल्या असं वरवर पाहताना दृश्यामधून वाटलं... मात्र, या  गळाभेटीमागचं खरं काय ते आता तुम्हाला दृश्यांमधून दिसेल... स्वागत करताना अनेकांची गळाभेट घेणाऱ्या सुप्रियांनी अजित दादांची गळाभेट मात्र घेतली नाही तर अजित दादांनीच आपल्या बहिणीला जवळ घेतलं होतं. 


तसंच, सुप्रिया दादांच्या पाया पडल्याचंही फोटोंमधून आणि दृश्यांमधून दिसलं... पण तसं घडलं नव्हतं... मग नेमकं काय झालं हे पाहण्यासाठी तुम्हाला ही दृश्यं पुन्हा पाहावी लागतील... खरं तर एका वृत्तवाहिनीचा खाली पडलेला माईक बाजुला करण्यासाठी सुप्रीया सुळे खाली वाकल्या होत्या... दादांच्या पाया पडण्यासाठी नव्हे...  


पुढे आल्यावर पत्रकारांनी अजित पवारांवर अनेक प्रश्नांचा भडीमार केला मात्र एका प्रश्नावर चिडत 'मी कुठे राष्ट्रवादीतून बाहेर पडलो... पक्षानं मला बाहेर काढलं का?' असे प्रश्न अजितदादांनीच माध्यमांना केले. 


अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन पुन्हा राष्ट्रवादीत आल्याच चित्र असलं तरी प्रत्येकाच्या मनात अजित दादांची आधीची इमेज पुन्हा निर्माण होईल का? हा प्रश्नच आहे.