मुंबई : मुंबईत पावसाला सुरूवात तर झाली आहे, मात्र वातावरणात हवातसा गारवा निर्माण झाला नाही. त्यामुळे या गारव्याच्या शोधात आता पर्यटकांची पावले  वॉटर किंगडमकडे वळली आहेत. त्यामुळे वॉटर किंगडम पर्यटकांची एकच गर्दी होताना दिसत आहे. विकेंडमध्ये मुंबईकरांसह पर्यटक वॉटर किंगडमधील वेव पुल, राईडसचा आनंद घेताना दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वॉटर किंगडममध्ये पर्यटक विकेंडचा पुरेपुर आनंद घेताना दिसत आहेत. वेव पूल, स्लाईडस, राईडस,लहान मुलांसाठी असलेले राईडस अशा सर्व राईडसा लहानांपासून मोठ्यापर्यत पर्यटक आनंद घेतायत. 


वॉटर किंग्डममध्ये “अब पानी उपर से भी” ही मोहीम राबवण्यात आली. या मोहीमेचा पर्यटकांनी मनसोक्त आनंद घेतला. वॉटर किंगडमच्या राइड्सचा मित्रांच्या ग्रुपने व कुटुंबांनी आनंद लुटला. प्रत्येक वयोगटासाठी सर्व मनोरंजनाची साधने असल्याने असंख्य पर्यटकांनी आपल्या कुटूंबासोबत वॉटर किंग्डमला हजेरी लावली होती.



वॉटर किंगडममध्ये ‘गो क्रेझी’ या मोहिमेच देखील आयोजन होते. या मोहीमेत क्रेझी होत पर्यटकांनी पुलमधील थंड वातावरणाचा आनंद लुटला. तसेच पुल डान्स करत मनसोक्त मजा केली. पर्यटकांनी असंख्य फोटो काढत संपुर्ण दिवस या वॉटर किंगडममध्ये आनंददायी वातावरणात घालवला.  


तुम्ही जर अजूनही वॉटर किंगडमचा आनंद घेतला नसेत तर वाट कसली पाहाताय, आताच तिकीट बुक करा आणि आपला विकेंड कुल करून घ्या.  https://www.waterkingdom.in/travel/ या वेबसाईटवर तुम्ही बुकिंग करू शकता. अगदी नगण्य दरात तुम्हाला इथं अनलिमिटेड एन्जॉय करता येणार आहे. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना इथं आनंद घेता येणार आहे. त्यामुळे लगेच तिकीट बुकिंग करा आणि वॉटर किंगडममध्ये आनंद घ्यायला तयार राहा.