मुंबई : राज्यात कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता शिगेला लागली असताना मुख्यमंत्री कोणाचा असावा, याचीच जास्त स्पर्धा लागलेली दिसून येत आहे. सध्या भाजप-शिवसेना युतीचे सरकार आहे. मुख्यमंत्री भाजपचा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत युती होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शिवसेनेने आमचाच मुख्यमंत्री असेल असे म्हटले आहे. आता भाजपही मागे नाही. मुख्यमंत्री पद हे भाजपचेच असेल. भाजपचाच हक्क आहे आणि तो राहिल, असे म्हटले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री भाजपचा असेल असे म्हटले आहे.


आम्हीच शिवसेनेला मदत केली!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा लढताना भाजपच्या जागा निवडून द्या असच आम्ही म्हणालो नाही. शिवसेनेच्या जागा निवडून आणण्यासाठी आम्हीच प्रयत्न केले आहेत. ज्या ठिकाणी शिवसेना कमकुवत होती, त्याठिकाणी आमची भाजपची टीम होती.आमच्या सगळ्यांची भूमिका आणि भावना मुख्यमंत्री भाजपचा राहावी, अशी आहे. मोठ्या भावाची आमची भूमिका आहे. निकाल राज्यातले बघितले तरी कोणाचा मुख्यमंत्री असावा, हे सांगण्याची गरज नाही, असे गिरीश महाजन म्हणालेत.


भाजप-शिवसेना एकत्र, लोकसभेपेक्षा मोठा विजय - दानवे


युतीत बिघाड होऊ नये म्हणून...


दरम्यान, मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ लागलेली दिसत आहे. मध्यंतरी दानवे यांनी भाजपचा मुख्यमंत्री असेल असे म्हटले होते. त्यावेळी शिवसेनेकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला होता. यावेळी त्यांनी सावध भूमिक घेतली आहे. आता गिरीश महाजन यांनीही भाजपचाच मुख्यमंत्री म्हटले आहे. मात्र, शेवटी त्यांनी कोणताही वाद होऊ नये म्हणून अंतिम निर्णय हा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेतील असे म्हणत सावरुन घेण्याचा प्रयत्न केला आहे.


काँग्रेस-राष्ट्रवादी हे भरकटलेल जहाज


दरम्यान, दोन्ही काँग्रेसला भाजपने टोला लगावला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी हे भरकटलेल जहाज आहे. विधानसभेला दोघांच्या मिळून ५० जागा ही येणार नाहीत. मेडिकल च्या ९७० UG जागा वाढीव मिळाल्या आहेत. आमची दोन हजार जागांची मागणी आहे. आणखी काही दिवसात खासगी कॉलेजसाठी ६०० ते ७०० जागा मिळतील. मंगळवार, बुधवारपर्यंत त्याबद्दल माहिती मिळेल, असे महाजन म्हणालेत.