मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपात, तर गृहमंत्री अमित शाह यांना तानाजी मालुसरेंच्या रुपात दाखवणारा वादग्रस्त व्हिडिओ तातडीनं हटवावा, यासाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यूट्युबशी संपर्क साधलाय. या व्हिडिओबाबत महाराष्ट्र सरकारकडे तक्रारी प्राप्त झाल्यात. त्यानुसार व्हिडिओ हटवण्याची सूचना यूट्युबला करण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वादग्रस्त व्हिडिओ बनवण्यात आलाय.


दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर पंतप्रधान मोदींचा चेहरा चिकटवण्यात आलाय. तर तानाजींना अमित शाहांचा चेहरा लावण्यात आला आहे. आता त्यावरुन जोरदार वादंग सुरू झालं आहे.