मनोज कुळकर्णी : (Mumbai Latest Weather Update) गेल्या आठवड्यापासूनच मुंबईतील (Mumbai) तापमानात घट झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबई आणि महाराष्ट्रात गेल्या तीन ते चार दिवसात हवामानात झपाट्यानं बदल झाला. कुठे कडाक्याची थंडी, कुठे ढगाळ वातावरण, तर कुठे सातत्यानं सुरु असणारा ऊन सावलीचा खेळ असंच वातावरण या शहरात पाहायला मिळत आहे. पण, हे नेमकं कशामुळे हे तुम्ची जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

(cold wave) हिवाळा म्हटलं की थंडी आलीच आणि थंडी आली की लोकरी कपडे (woolens) कपाटातून हमखास बाहेर येणं झालं. पण, मुंबईतील नागरिक मात्र सकाळच्या वेळी उकाड्यानं त्रस्त होतात, तर रात्रीच्या वेळी हल्ली म्हणे त्यांना हुडहूडी भरते. पण, हे नेमकं का होऊ लागलं आहे?  कुलाबा वेधशाळेच्या वैज्ञानिक सुनीता नायर यांनी यासंदर्भातील माहिती दिली. 


क्षणात का बदलताहेत मुंबईच्या हवामानाचे रंग? 


'जेव्हा वेस्टर्न डिस्टर्बन्स होतं म्हणजे ज्याला हवामान खात्याच्या भाषेत पश्चिमी विशोब म्हणतात तेव्हा हे परिणाम दिसून येतात. ज्यावेळी जम्मू काश्मीर, लेह- लडाख या ठिकाणी बर्फवृष्टी होते त्यावेळी वेस्टर्न डिस्टर्बनस येतात आणि  त्यामुळेच थंडीचा कडाका कमी होतो. त्याचे परिणाम म्हणजे ढगाळ वातावरणाची निर्मिती', थोडक्यात हेच मुंबईतील हवामान बदलमागाचं मुख्य कारण. 


सोमवारपासून पुन्हा थंडी वाढणार


मुंबईतली थंडी या आठवड्याच्या शेवटापासून वाढण्यास सुरुवात होणार असून, पारा 16 अंशापेक्षाही खाली येऊ शकतो.  वेस्टर्न डिस्टर्बनस कमी झाल्यानंतर मुंबईतील थंडी वाढणार आहे. 


हेसुद्धा वाचा : Weather Rain Update : राज्याच्या 'या' भागात कोसळणार पाऊसधारा; 'इथं' सुटेल झोंबणारा गार वारा  


हा तोच कालावधी आहे, जेव्हा (Jammu kashmir) जम्मू काश्मीर ,लेह लडाख (leh ladakh) मध्ये बर्फवृष्टी होते यामुळे उर्वरित देशात गार वारे वाहतात. इराण, इराक, अफगाणिस्तान या ठिकाणाहून हे वेस्टर्न डिस्टर्बनस येतात. राज्यात पावसाळ्यात पाऊस पडतो तसा यावेळी उत्तरेकडे पाऊस पडतोय. मुंबई आणि महाराष्ट्रात हेच वारे येतात आणि म्हणून थंडी वाढते. 


थोडक्यात सांगावं तर, मुंबईत पुढील आठवड्यात 4 ते 5 दिवस थंडीचा कडाका वाढू शकतो नंतर पुन्हा वातावरण सर्वसामान्य होईल. गार वारे गेल्यावर हवेतील शुष्कता वाढते आणि परिणामस्वरुप तापमानही वाढते. पूर्व, दक्षिण पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमध्ये फारसा गारवा नसतो त्याचाच परिणाम मुंबईतील हवामानावर होतो.