Mumbai Air Quality : (Winter wave in north india) सध्या देशाच्या उत्तरेकडे तापमानात लक्षणीय घट होत असताना मुंबईतही (Mumbai) याचे परिणाम दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईचं तापमान माथेरानहूनही कमी म्हणजेच 15 ते 16 अंशावर पोहोचल्यामुळं शहरातील हवेची गुणवत्ता भीतीदायकरित्या ढासळली आहे. मुंबईसोबतच पुण्यामध्येही हवेच्या प्रदूषणासंदर्भात हेच चित्र पाहायला मिळत आहे. प्रदूषणात झालेल्या या वाढीमुळं पुढील दोन दिवसांत मुंबईतील हवा अतिधोकादायक पातळीवर पोहोचू शकते, तर पुण्याची हवा धोकादायक पातळीवर राहू शकते. थोडक्यात मुंबई आणि पुणेकरांनो (Pune), श्वास घेतानाही सावधान! 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘सफर’ कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकड्यांनुसार मुंबईत असणारं ढगाळ वातावरण आणि कमी झालेली दृश्यमानता हे या प्रदूषणाचेच परिणाम आहेत. सरत्या दिवसांमध्ये वाढलेल्या थंडीमुळं मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांतील प्रदूषणात वाढ झाली आहे. प्रदूषणकारी धूलिकणांचं प्रमाण वाढून हवेची गुणवत्ता दिवसागणिक खालावली आहे. किंबहुना येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये हवा आणखी प्रदूषित होऊ शकते असाही इशारा देण्यात आला आहे. 


नेमकी कुठे प्रदूषित आहे हवा? 


मुंबईमध्ये कुलाबा, माझगाव, अंधेरी, चेंबुर, मालाड, नवी मुंबई येथील हवेची गुणवत्ता अतिधोकादायक असल्याचं स्पष्ट झालं आहे. तर, पुण्यामध्ये शिवाजीनगरमधील हवा अतिधोकादायक असून, हडपसर, कोथरूड येथील हवा धोकादायक असल्याचं अहवालातून समोर आलं आहे. 


हेसुद्धा वाचा : Weather Update : हिमाचलहूनही दिल्ली थंड, पाहा महाराष्ट्रातील तापमानाचा अचूक अंदाज 


नागरिकांनो सावध व्हा! 


मुंबई आणि पुण्यामध्ये खालावलेली हवेची गुणवत्ता ही शहरातील नागरिकांना अडचणीत आणू शकते. सध्याच्या घडीला अनेकांनाच श्वसनास त्रास, खोकला, घशात वेदना, थकवा आणि डोकेदुखी असा त्रास होत आहे. अस्थमा असणाऱ्या रुग्णांनी संपूर्ण परिस्थितीत प्रचंड काळजी घेण्याचं आवाहनही सध्या करण्यात येत आहे. इतकंच नव्हे तर, शक्यतो शारीरिक श्रमांची कामं टाळा, अधिक वेळ घराबाहेर घालवू नका, सतत खोकला आणि श्वसनास त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या असंही आवाहन करण्यात आलं आहे. 


मुंबई आणखी गारठणार 


येत्या आठवड्यामध्ये मुंबई आणि उपनगरांमध्ये तापमान मोठ्या फरकानं घसरण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. वेस्टर्न डिस्टर्बनस कमी झाल्यानंतर शहरातील गारठा वाढणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. थोडक्यात मुंबईताली उत्तरेकडील थंडीचा तडाखा बसणार. त्यामुळं मुंबईकरांनो, काळजी घ्या!