Mumbai Weather News : हुश्श! मुंबईवर धडकणाऱ्या चक्रीवादळानं बदलली दिशा; आता `इथं` धोक्याचा इशारा
Mumbai Cyclone Tej : `तेज` चक्रीवादळ नेमकं कोणत्या दिशेला निघालंय? पाहा मोठी बातमी आणि वादळाचं लाईव्ह लोकेशन. शहरावरील धोका टळला तरी आता वादळ कुठंय?
Mumbai Cyclone Tej : भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार मुंबईवर मागील काही तासांपासून चक्रीवादळसदृश्य वारे घोंगावत असून हे वारे शहराच्या किनाऱपट्टी भागात धडकणार अशी भीत व्यक्त केली जात होती. पण, आता मात्र हा धोका टळला असून, वादळानं दिशा बदलल्याची माहिती स्पष्ट होत आहे.
सध्याच्या घडीला अरबी समुद्रामध्ये चक्राकार वादळांची निर्मिती झालेली असली तरीही त्याचं रुपांतर पूर्णपणे चक्रीवादळात झालेलं नाही. असं असलं तरीही भारताला या वादळाचा फारसा धोका पोहोचणार नसून ते ओमान आणि येमेनच्या दिशेनं पुढे जाताना दिसत आहे.
अरबी समुद्रामध्ये तयार होणाऱ्या या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं निर्माण होणारी चक्रीवादळाची परिस्थिती पाहता अशा प्रकारची वादळं मान्सूनच्या मोसमानंतर बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात तयार होतात. भारतात मान्सून साधारणत: जून ते सप्टेंबरदरम्यान असतो, तर मान्सूननंतर सुरु होणारं वादळांचं सत्र ऑक्टोबर ते डिसेंबर या काळापुरता सीमीत असतं.
हेसुद्धा वाचा : Moon Walk: चंद्रावर असा दिसतो फॅशन शो, Video पाहून म्हणाल कसलं भारीये हे!
2023 मध्ये आणखी कोणतं वादळं येणार?
हवामान विभागाच्या माहितीनुसार हमून नावाचं चक्रीवादळ 2023 मध्ये धडकणार असल्याची शक्यता आहे. येणाऱ्या काही महिन्यांमध्ये हे वादळ धडकू शकतं. सर्वसामान्य माहितीनुसार चक्रीवादळांची निर्मिती बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात होते. सहसा या चक्रीवादळांचा लँडफॉल भारत, बांगलादेश, पाकिस्तान किंवा इराणमध्ये होतो. सध्या तयार होणाऱ्या चक्रीवादळाला भारताकडून 'तेज' हे नाव देण्यात आलं होतं. यापुढील म्हणजेच हमून आणि मिधीली या चक्रीवादळांना नाव देण्याचं श्रेय अनुक्रमे इराण आणि मालदीवला मिळेल.