मुंबई : मुंबईच्या पश्‍चिम द्रुतगती महामार्गावर सांताक्रुझ परिसरात आज सकाळी लोखांडी सळयांनी भरलेला ट्रॅक उलटल्यामुळं, पश्‍चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूकीचा खोळंबा झाला आहे. 


उलटलेला ट्रक बाजूला करण्यात आला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांताक्रुझ, अंधेरी, विलेपार्ले या परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या मदतीनं ट्रॅक बाजूला केला आहे.


पण बराच वेल वाहनांच्या रांगा 


मात्र सकाळच्या दरम्यान ट्रक कलंडल्याने महामार्गावरुन प्रवास करून, कामावर जाणाऱ्या चाकरमान्याचे हाल झाले आहेत. मात्र ट्रक बाजूला केल्यानंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, वाहतूक सुरळीत होण्यासही जास्त वेळ जाणार आहे.