मुंबई : पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी. फेब्रुवारीपासून मुंबई सेंट्रलहून देशभरात कुठेही प्रवास करायचा असेल, तर ऑनलाईन आरक्षण करण्यासाठी लागणारा स्टेशन कोड बदलण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक ऑक्टोबरला मुंबई सेंट्रलचा कोड बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी याविषयी घोषणाही करण्यात आली. पण त्याची अंमलबजाणी आता रेल्वे संबंधित अॅप्सवर सुरु झाली आहे. एक फेब्रुवारीनंतरच्या  ऑनलाईन किंवा इतर कुठल्याही प्रकारे आरक्षण करण्यासाठी आता मुंबई सेंट्रलचा कोड MMCT असा असणार आहे.  


परिणामी प्रवाशांना १ फेब्रुवारीनंतरच्या मुंबई सेंट्रलहून निघणाऱ्या गाड्यांचा अॅपवर शोध घ्यायचा असेल तर त्यासाठी यापुढे MMCT हा कोड टाकावा लागत आहे. कालपासून सोशल मीडियावर अॅपवरून मुंबई सेंट्रल स्टेशनच गायब झाल्याच्या वावड्या उठू लागल्यावर पश्चिम रेल्वेनं हे स्पष्टीकरण जारी केलंय.