मुंबई : शिवसेनेकडून 16 आमदारांच्या निलंबनाची मागणी करण्यात आलीय. शिवसेनेची तक्रार विधीमंडळ सचिवांकडे जाणार आहे. त्यानंतर 12 आमदारांना नोटीस काढून त्यांची भूमिका विचारली जाईल. 16 आमदारांना प्रत्यक्ष येणं शक्य नसेल तर त्यांचं म्हणणं ऑनलाईन ऐकलं जाईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्राची एनआयसीची ब्रॉडबॅण्ड सेवा यासाठी दिली जाते. दिवसभरात 3 ते 4 आमदारांची सुनावणी होऊ शकते.  पण केंद्राने परवानगी दिली तर जास्तवेळ ही सेवा मिळू शकते. सर्व आमदारांचं म्हणणं ऐकल्यावर विधीमंडळ निर्णय देणार आहे.


विधानमंडळातील सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत नेमकी काय कारवाई होऊ शकते


1) शिवसेनेकडून अपात्रतेबाबत विधान सभा उपध्याध्यक्षाकडे याचीका दाखल करण्यात आल्या नंतर आता विधानसभा उपाध्यक्ष त्या 16 आमदारांना नोटीस इशु करू शकतात


2) आमदारांना नोटीस इशु केल्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष नोटीसीबाबत नेमकं त्या आमदारांच काय म्हणणं आहे याबाबत त्यांचं म्हणण जाणुन घेणार


3) कोरोना नंतर देखील आमदारांना ऑनलाईन सुनावणीसाठी उपस्थित राहू शकतात किंवा त्यांना स्वतः याठिकाणी येऊन सुनावणीसाठी उपस्थित राहावं लागणार आहे


4) जर ते ऑनलाईन उपस्थित राहू इच्छितात तर त्यासाठी नॅशनल इनफॉरमेटिक सेंटरकडून देण्यात आलेल्या बँडविडथचा वापर करावा लागणार आहे. सध्याच्या परिस्थीती या बँडविडथची उपलब्धता पाहता दिवसाला केवळ 2 किंवा 4 आमदारांची सुनावणी पार पडू शकते. 


5) ही अर्धन्यायिक प्रक्रिया आहे. यासाठी विशिष्ट वेळेची मर्यादा नाही माञ विधान भवनाच्या वतीने ही सुनावणी लवकरात लवकर पार पडावी यासाठी प्रयत्न होणारं आहेत