हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा रविवारी पालघरजवळ भीषण अपघातात मृत्यू झाला. सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानं रस्ते सुरक्षेचा मुद्दा पुन्हा अधोरेखित झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायरस मिस्त्री  यांच्या निधनानंतर कारमधील सीट बेल्टचाही  (seat belt) मुद्दा तापला आहे. सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात (car accident) मृत्यू झाला. त्याने सीट बेल्ट घातला नसल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. तसेच गाडीचा वेग नियंत्रित न झाल्याने हा अपघात झाला.


 मर्सिडीज बेंझ (Mercedes-Benz) जीएलसी 220 डी 4 मॅटिक कारने मिस्त्री मुंबईकडे येत असताना त्यांची कार दुभाजकावर आदळल्याने त्यांचा मृत्यू झाला. कारमध्ये चार जण होते, त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. या अपघातानंतर मर्सिडीज बेंझच्या अधिकाऱ्यांनी कारची पाहणी केली. 


मर्सिडीज-बेंझने अपघातग्रस्त कारची डेटा चिप जर्मनीला पाठवण्यात आल्याची माहितीही समोर आली होती. त्यानंतर गाडीचा डेटा तपासणी साठी घेतला होता त्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे.


अपघाताआधी मिस्त्री यांच्या कारचा स्पीड 100 किमी प्रति तास होती. त्यानंतर पाच सेकंदामध्ये धोका असल्याचे जाणवल्यानंतर ब्रेक मारला तेव्हा ही गाडीन 89 च्या स्पीडने कठड्याला धडक दिली. त्यामुळे गाडीचा वेग  फक्त 11 किमी प्रती तास एवढा कमी झाला आणि त्यामुळे हा भीषण अपघात घडला अशी माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली.