मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोविडच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट व टिव्ही मालिका निर्माते यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाढत्या कोरोना संसर्गाबाबत चर्चा करून शासन घेत असलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने सहकार्य करावे असे आवाहन केले. 


मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर निर्मात्यांनी देखील आपल्या विविध सूचना मांडून एकजुटीने शासन घेईल त्या निर्णयांना पाठिंबा असेल असे निर्विवाद आश्वासन दिले


या बैठकीत महेश भट, सुषमा शिरोमणी, मेघराज राजेभोसले, मनोज जोशी, सुबोध भावे, डॉ अमोल कोल्हे, सिद्धार्थ रॉय कपूर, अमित बहेल, निखिल साने, दीपक राजाध्यक्ष, अजय भाळवणकर, टी पी अग्रवाल, सतीश राजवाडे, संग्राम शिर्के, अशोक दुबे, नितीन वैद्य, अशोक पंडित, अभिषेक रेगे, दीपक धर आदींची उपास्थिती होती.


यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास आदी देखील सहभागी झाले होते