मुंबई : मुंबई ड्रग्ज प्रकरणात गुरुवारी आर्यन खानला जामिन मंजूर झाला. तर आज आर्यनची आर्थर रोड जेलधून सुटकाही झाली. दरम्यान आर्यनच्या जेलमधून होणाऱ्या सुटकेसाठी शाहरूखची जवळची मैत्रिण जूही चावला हीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री जुही चावला आर्यन खानसाठी जामीनदार बनली आहे. जुही चावलाने काल म्हणजेच शुक्रवारी सेशन कोर्टात जाऊन 1 लाख रुपयाच्या बेल बाँडवर स्वाक्षरी केली. त्यामुळे जुही चावलाची जबाबदारी आता अधिक वाढली आहे. 


जुही चावलाची भूमिका काय?


जुही चावलाने आर्यनच्या बेल बाँडवर स्वाक्षरी केली आहे. याचा अर्थ असा आहे की, आर्यन खान जर बेल बाँडची रक्कम भरु शकला नाही, तर त्याला पूर्णपणे कायदेशीररीत्या जुही चावला जबाबदार ठरणार आहे. मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आर्यनच्या सुटकेचे कागद पाठवण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची होती.


जो कोणी जामीनदार बनतो, त्याची जबाबदारी लक्षणीय वाढते. याबाबत कायदेतज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे आहे की, जामीनदार हा केवळ बेल बाँड भरण्यापुरता मर्यादित नसून, जामिनावर सुटल्यानंतर आरोपी न्यायालयात हजर न झाल्यास त्याला हजर करणं ही देखील त्याची जबाबदारी असते.


कायदेतज्ज्ञांचे म्हणणं आहे की, फौजदारी खटल्यातील आरोपीला जामीन देताना न्यायालयाने वैयक्तिक जातमुचलक्यासह जामीदारही सादर करावा अशी अट असते. यादरम्यान आरोपीच्या वतीने जामीनपत्र न्यायालयात सादर केलं जातं. त्या जामीनपत्रात आरोपींचा तपशील, तसंच जामिनाच्या रकमेचा तपशील भरलेला असतो. बाकीच्या भागात त्याने कोणाला जामीनदार केलं याचा तपशील आहे. त्या तपशिलात जामीनदाराचे नाव, पत्ता इ.सह तो कोणाचा जामीनदार झाला आहे आणि जामीनाची रकमेची रक्कम दिलेली असते.