दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई :  आज राज्य मंत्रीमंडळाची बैठक संपल्यावर सभागृहातून सर्व अधिकारी बाहेर पडले त्यानंतर फक्तं कँबिनेट मंत्री आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सर्व मंत्र्याशी महत्वाची चर्चा झाली.
या चर्चेत अर्थातच भाजपकडून सातत्याने होत असलेल्या गंभीर आरोपांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत नेमकी काय काय चर्चा झाली वाचा.


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    - 'अधिकाऱ्यांना ओळखण्यात आपण कमी पडलो.'

  • - 'फोन टॅप होत असतील तर कामं कशी होतील.'

  • - 'अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवायचा कसा.'

  • - 'देवेंद्र फडणवीस यांना उघडं पाडलं पाहिजे.'

  • - 'आपण सर्वांनी एकत्र लढलं पाहिजे.'


 


कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांचा इतर मंत्र्यांशी झालेला संवाद.


आपण काम कसं करणार, फोन टॅप होतात. असं होत असेल तर ही गंभीर बाब आहे. - अशोक चव्हाण , सार्वजनिक बांधकाम मंत्री


'आपण एकत्र लढलो पाहिजे' - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री


'देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप खोडून काढले पाहिजे. देवेंद्र फडणीस यांना उघडं केलं पाहिजे.' - जितेंद्र आव्हाड 


आपण अधिका-यांना ओळखण्यात कमी पडतोय? अधिका-यांवर विश्वास ठेवायचा कसा?   नवाब मलिक 


'माझ्यावर झालेले आरोप खोटे आहेत. माझ्याकडून कोणताही पैशांचा व्यव्हार झाला नाहीये.' : अनिल देशमुख, गृहमंत्री