मुकेश अंबानींच्या ``या`` सल्ल्यामुळे बदललं जावयाचं आयुष्य
काय म्हणाले मुकेश अंबानी
मुंबई : अंबानी कुटुंबात आता दुहेरी आनंदोत्सव साजरा होत आहे. मुलाच्या लग्नाच्या आनंदाच्या बातमीनंतर आता ईशाचं देखील लग्न ठरल्याची बातमी मिळाली आहे. आनंद पिरामलसोबत ईशा अंबानीचं लग्न ठरलं आहे. आनंद पिरामलने सर्वोत्तम शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलं आहे. 26 वर्षीय ईशाचं लग्न 33 वर्षीय आनंद पिरामलसोबत ठरलं आहे. आनंद पिरामल हा पिरामुल ग्रुपचे चेअरमन अजय पिरामल यांच्या मुलाशी ठरलं आहे. हे लग्न डिसेंबर महिन्यात होणार आहे.
सासऱ्यांनी जावयाला दिला हा सल्ला
महत्वाची बाब म्हणजे मुकेश अंबानी यांनी आपल्या जावयाला लग्ना आधीच खूप महत्वाचा सल्ला दिला. हा किस्सा स्वतः आनंद पिरामलने एका कार्यक्रमात सांगितला आहे. आनंद आपल्या यशस्वी व्यावसायाचे संपूर्ण श्रेय हे सासरे मुकेश अंबानी यांना देत आहे. माझं करिअर नेमकं कन्सल्टिंगमध्ये करावं की बँकिंगमध्ये हा प्रश्न होता. यावेळी मुकेश अंबानी यांनी मला मार्गदर्शन केले आहे.
आनंद पिरामलला झाला फायदा
त्यावेळी मी मुकेश अंबानींचा सल्ला घेतला. मुकेश अंबानी मला म्हणाले कि, कन्सल्टंट म्हणजे क्रिकेट सामना पाहण्यासारखे किंवा त्या मॅचचे समालोचन करण्यासारखे आहे. व्यवसाय सुरु करणे म्हणजे प्रत्यक्ष क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे. समालोचन करताना तू क्रिकेट कसे खेळायचे हे शिकू शकत नाहीस. तुला काही करायचे असेल तर आताच उद्योग-व्यवसाय सुरु कर.
इथून घेतलं महत्वाचं शिक्षण
पिरामल उद्योग समूहाच्या कार्यकारी संचालक पदावर असणाऱ्या आनंदने पेन्सिलवेनिया विद्यापीठाच्या हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीएची पदवी घेतली आहे. त्याशिवाय इंडियन मर्चंट चेंबरच्या- युथ विंगचा सर्वात तरुण अध्यक्ष म्हणूनही आनंदची वेगळी ओळख आहे. वडील अजय पिरामल यांना व्यवसायात साथ देण्यापूर्वी आनंदने ‘पिरामल ई- स्वास्थ्य’ या स्टार्ट- अपची सुरुवात केली होती तसेच रिअल इस्टेट व्यवसायाचेही काम पाहतो.