मुंबई : कोरोना रुग्णांचा आकडा सतत वाढत आहे. देशातील सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एकट्या महाराष्ट्रात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं. आपण लॉकडाऊन केलं आणि त्यातनं काही गोष्टी साध्य होत आहे. लॉकडाऊन हे जसं अचानक लावणं योग्य नाही, तसं अचानक काढणंही योग्य नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. रविवारी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशासह महाराष्ट्रासह 31 मेपर्यंत लॉकडाऊन आहे. राज्यातलं लॉकडाऊन कधी उठणार, उठणार की राहणार? लॉकडाऊनवर केवळ हो किंवा नाही बोलणं हा असा विषय नाही. कोरोना व्हायरसचा गुणाकार सतत वाढतो आहे. आणखी काही दिवसांत, आणखी काही रुग्ण वाढणार आहेत. लॉकडाऊन अचानक लावणं जसं योग्य नाही तसं ते अचानक उठवणंही योग्य नाही. आपण हळू हळू आपण गोष्टी पूर्वपदावर आणत आहोत. जशा गोष्टी हळू-हळू बंद केल्या, तशाच आता हळू-हळू सुरु करत आहोत. काही गोष्टी रिओपन करताना खबरदारीने पाऊलं टाकावी लागणार आहेत. लॉकडाऊन आपण नक्की हळू-हळू उठवतं आहोत. 70 हजार उद्योग-धंद्यांना परवानगी दिली आहे. त्यातील 50 हजार उद्योग सुरु झाले आहेत. महाराष्ट्रासह, मुंबईतील काही भागात दुकानं सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन शब्द वापरु नका, असं मुख्यमंत्री म्हणाले.


लॉकडाऊनबाबत जरी सरकारने परवानगी दिली, तरी एक अट असणार आहे. आधी पाहणार कितपत गर्दी होते., गर्दी झाली तर पुन्हा दुर्दैवाने जे सुरु केलं आहे ते बंद करावं लागणार. त्यामुळे गर्दी करु नका. एकदा दुकानं उघडलं तर ते पुन्हा गर्दीमुळे बंद होता कामा नये. त्यामुळे ही काळजी घेणं गरजेचं आहे. दुकानांबाहेर रांगा लावून, अंतर राखून खरेदी करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.


कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव संसर्गजन्य असल्यामुळे लॉकडाऊन करणं गरजेचं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत आणखी काही दिवस शिंकताना-खोकताना नाका-तोंडावर हात ठेवणं, इतरत्र थुंकू नये या गोष्टी पाळाव्या लागणार आहेत. पुढचे काही महिने सतत मास्क लावून फिरावं लागेल, हात धुवावे लागणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. कोरोनानंतरचं जग हे काहीसं असं असेल असंही मुख्यमंत्री म्हणाले.