मुंबई : आता सगळीकडे लग्नांचा खास मौसम आहे. लग्नातला आहेर हा कायमच चर्चेचा विषय असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशाच एका लग्नातील आहेराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या लग्नात वराला चक्क भाजीपाल्यांचा आहेर मिळाला आहे.आपल्याला माहितच आहे हिवाळ्यात भाज्या या अगदी ताज्या असतात. त्यामुळे लग्नातीस हा "ताजा आहेर" सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


का होतोय व्हायरल?


हल्ली लग्नाला मित्र - मैत्रिणी आहेर देताना वधु - वराच्या आवडीचा विचार करतात. पण काही अगदी जवळचे मित्र हा असा प्रकार करतात. या वराला मिळालेला हा 'ताजा आहेर' त्याच्या सुखी संसारासाठी फ्रेश करण्यासाठी दिला असल्याचं वाटतं. 


संसाराला सुरूवात झाल्यामुळे त्याला हा आहेर देण्यात आल्याचं कळतं. हा व्हिडिओ शनिवारी लग्न झालेल्या वधु- वराचा असून सध्या तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. यामध्ये त्या वराच्या मित्र परिवाराने अगदी मेथी पासून ते कारल्यापर्यंत साऱ्या भाज्या आहेर म्हणून दिला आहे. यात अनेक फळभाज्या, पालेभाज्यांचा समावेश आहे. या व्हिडिओत आहेर देताना मित्र सांगत आहेत की, आता तुमचा संसार सुरू झाला आहे.... म्हणून हा "ताजा आहेर"



हा व्हिडिओ सध्या अनेकांच्या चर्चेचा विषय आहे. ३ डिसेंबरला हा विवाह सोहळा झाला असून दोनच दिवसात हा व्हिडिओ भरपूर व्हायरल झाला आहे. अगदी लग्नात एक गम्मत म्हणून हा आहेर देण्यात आला. वरावरील प्रेम लक्षात घेता या आहेराचा निवड करण्यात आली. त्यामुळे या व्हायरल व्हिडिओवर  नाराज न होता वधु - वराने ही गोष्ट सकारात्मक घ्यायला हवी.