मुंबई : पंजाब नॅशनल बँक अपहार प्रकरणात मुख्य आरोपी नीरव मोदी याची पत्नी एमी मोदी हिचीही भूमिका महत्त्वाची असल्याचं उघडकीस आलंय. 


हनी ट्रॅपचा वापर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकाऱ्यांकडून गैरकारभार करुन घेण्यासाठी एमी मोदीनं 'हनी ट्रॅप'चा वापर केल्याची माहिती सूत्रांकडून समजतेय. यासाठी तिनं काही मॉडेल्सचीही मदत घेतल्याचं उघड झालंय. अटक करण्यात आलेल्या बँकेच्या तिन्ही अधिकाऱ्यांवर 'हनी ट्रॅुप'चा वापर करण्यात आल्याचं समजतंय.


तिघांना अटक


पंजाब नॅशनल बँक अपहार प्रकरणी तिघांना अटक करण्यात आलीय. यात या बँकेचा निवृत्त अधिकारी गोकुळनाथ शेट्टी याचाही समावेश आहे. शेट्टी हा पीएनबीच्या ब्रीच कँडी शाखेचा उपव्यवस्थापक होता. या घोटाळ्यातील अटकेची ही पहिली मोठी कारवाई आहे.  शेट्टीसह सिंगल विंडो ऑपरेटर मनोज खरात आणि नीरव मोदी ग्रुप ऑफ फर्म्सचा अधिकृत स्वाक्षरीकर्ता हेमंत भटलाही सीबीआयने अटक केलीय. सीबीआयने ही कारवाई केलीय. 


दरम्यान, याअगोदरच पंजाब बँक अपहार प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि हिरे व्यापारी नीरव मोदी परदेशात पळून गेलाय. पीएनबी अपहारप्रकरणी १७ ठिकाणी छापे मारण्यात आले आहेत. बँकेचे १८ कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. तर नीरव मोदी आणि मेहूल चोकसीचा पासपोर्ट रद्द करण्यात आलाय. तसेच अपहारप्रकरणी तिघांविरोधात इंटरपोलची नोटीस बजावण्यात आली आहे.