मुंबई : Hindustani Bhau News : चिथावणीखोर आंदोलन करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना भडकावणाऱ्या हिंदुस्थानी भाऊ तथा बबलू पाठक याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. (Mumbai Police arrested Bablu Pathak) आता धक्कादायक माहिती पुढे येत आहे. तसेच काँग्रेसने या हिंदूस्तानी भाऊवरुन भाजपवर निशाणा साधला आहे. हिंदूस्तानी भाऊ याला सोशल मीडियावर प्रस्थापित करुन त्याला फेमस करणारी व्यावसायिक कंपनी ही भाजप आणि संघाच्या संबंधित लोकांची होती, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Congress spokesperson Sachin Sawant) यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक वेळा हिंदूस्तानी भाऊ हा व्यक्ती द्वेषपूर्ण आणि शिवीगाळ युक्त धर्मांध वक्तव्य करीत असताना फेसबुक व इतर सोशल मीडिया त्यावर कारवाई करत नव्हते. कारण त्याला संरक्षण होते, असा आरोप काँग्रेसचे नेते सचिन सावंत  यांनी केला आहे.


हल्ली ज्या पध्दतीने मुलांना भडकवण्याचे काम करत आहे आणि ज्या पध्दतशीरपणे आंदोलनं केली जात आहेत, त्यामागे महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचा भाजपचा डाव दिसतो. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी राज्य सरकारने करावी, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे. 


कोण आहे हा हिंदूस्तानी भाऊ?


दहावी बारावी ऑफ लाईन परीक्षा नको, ऑन लाईन घ्या या मागणीसाठी राज्याव्यापी आंदोलनात बबलू पाठक तथा हिंदुस्तानी भाऊ हा सक्रिय होता, अशी माहिती पुढे आली आहे. "रुक जरा सबर करो" या संवादामुळे सोशल मीडियावर प्रकाश झोतात  आला. तसेच तो अभिनेता सलमान खान याचा प्रसिद्ध शो बिग बॉस 13मध्ये तो होता, अशी माहिती आहे.


कोरोना नियम तोडून विद्यार्थ्यानच्या परीक्षा रद्द करा आणि शुल्क माफ करा म्हणून आंदोलन केले होते म्हणून शिवाजी पार्क पोलिसांनी कारवाई केली होती. तो क्राईम रिपोर्टर म्हणून पूर्वी काम करीत होता. 2011 मध्ये त्यांना पत्रकारितेत पुरस्कार मिळाला होता. तसेच भारत पाकिस्तान संबंधांवर युट्युबवर अनेकदा वादग्रस्त वक्तव्य अन शिवीगाळ केल्याने तो अल्पावधीत प्रसिद्ध झोतात आला होता, अशी त्याच्याबाबत माहिती आहे.


दरम्यान, युट्युबवर 5 लाखांपेक्षा जास्त सबस्क्राईबर आहेत. वर्षाला युट्युब द्वारे 40 लाखांपेक्षा जास्त पैसे कमावत असल्याची माहिती आहे.