दक्षिण मुंबईत का हवी अधिकाऱ्यांना घरं, १ इंचही जमीन देणार नाही-गडकरी
नौदलाला दक्षिण मुंबईत फ्लॅट बांधण्यासाठी, एक इंचही जमीन दिली जाणार नाही.
मुंबई : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी गुरूवारी, नौदलातील अधिकाऱ्यांना सांगितलं, अलिशान दक्षिण मुंबईत राहण्याची गरज काय आहे, तसेच नौदलाला दक्षिण मुंबईत फ्लॅट बांधण्यासाठी, एक इंचही जमीन दिली जाणार नाही.
नौदलाची गरज ही सीमा सांभाळण्याची
गडकरी यांनी सांगितलं, नौदलाची गरज ही सीमा सांभाळण्याची आहे, सीमेवर अतिरेकी घुसखोरी करतात, पण प्रत्येक जण दक्षिण मुंबईत राहू इच्छीतो, ते माझ्याकडे आले होते, भूखंड मागत होते, मी सांगितलं, मी एक इंचही जमीन देणार नाही, कृपया माझ्याकडे येऊ नका, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.
नौदलानेही यापूर्वी नाकारली परवानगी
गडकरींनी पश्चिम नौसैनिक कमान प्रमुख व्हाइस अॅडमिरल गिरीश लुथरा यांच्या उपस्थित, हे जाहीर वक्तव्य केलं. नौदलाने यापूर्वी तरंगणार हॉटेल आणि सीप्लेन सेवा सुरू करण्याच्या योजनेला परवानगी दिली नव्हती, वास्तविक हायकोर्टाने याला हिरवा कंदील दिला होता. यानंतर नितीन गडकरी यांनी वरील वक्तव्य, एका जाहीर कार्यक्रमात केलं आहे.