शाह-ठाकरे भेटीपासून रावसाहेब दानवे दूर का?
भाजप अध्यक्ष अमित शाह आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीपासून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना दूर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.
मुंबई : भाजप अध्यक्ष अमित शाह आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीपासून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना दूर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. शिवसेनेनं राज्यातल्या भाजप नेत्यांना भेटीपासून दूर ठेवण्याची मागणी केली. त्यामुळे दानवेंना मातोश्रीला येण्यापूर्वीच माघारी पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र आपल्याकडे दुसरी जबाबदारी सोपवल्यामुळे आपण मातोश्रीवर जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचा दावा रावसाहेब दानवेंनी झी २४ तासशी बोलताना केला.