मुंबई : गणेशोत्सव उत्सवाची धूम आता सगळीकडे पाहायला मिळते. अवघ्या एका आठवड्यावर हा सण येऊन ठेपलाय. सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची तयारी दिसत असताना एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोत बाप्पाच्या बालपणीचं रूप आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच फोटोत पार्वती बसली आहे. आणि ती बालगणेशाला काही तरी सुचना देताना दिसतेय. आणि बाल गणेश देखील अगदी लक्ष देऊन त्या सगळ्या गोष्टी ऐकत असताना दिसत आहे. आणि या फोटोसोबत असा मॅसेज आहे की.... सावकाश जा, तिकडे गेल्यावर जास्त मोदक खायचे नाहीत अन् येताना प्लिज ते सोनु माझ्यावर भरोसा वगैरे गाण पाठ करून नको येऊ. मागच्या वर्षी शांताबाई शांताबाई ऐकुन डोकं दुखलं आमचं!


 


सध्या या बाप्पाच्या फोटोला खूप पसंती आहे. पण या फोटोतून खूप भयाण आणि कटू सत्य मांडण्यात आलं आहे. आपण प्रत्येकानेच अनुभवलं आहे की, बाप्पाच्या या ११ दिवसाच्या उत्सवात गणपतीची गाणी कमी आणि अशाच सोशल व्हायरल गाण्यांना अधिक मागणी असते. अशीच गाणी वेगवेगळ्या मंडपात आणि घरोघरी वाजत असतात. अशावेळी आपण कुठे तरी ही गोष्ट थांबवली पाहिजे असं यामधून सांगण्यात आलंय.