मुंबई : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंची पक्षांतर्गत बढती होणार आहे. शिवसेनेच्या तिसऱ्या पिढीचं नेतृत्व आदित्य ठाकरेंकडे देण्याची तयारी सुरू झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेच्या नेतेपदी आदित्य ठाकरेंची निवड होण्याची शक्यताय. शिवसेनेच्या पक्षांतर्गत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. शिवसेनापक्षप्रमुख, शिवसेना नेते,राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आणि शिवसेना उपनेते या निवडणुकीत नेमले जाणार आहेत. 


विद्यामान नेत्यांपैकी डॉ मनोहर जोशी आणि सुधीर जोशी या ज्येष्ठ नेत्यांना पक्षाचे मार्गदर्शक म्हणून नवी पदे निर्माण करून नेमलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या पदासह  नेतेपदासाठीच्या शर्यतीत राज्यात कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री अनंत गीते, लोकसभा गटनेते आनंदराव अडसूळ, ज्येष्ठ खासदार चंद्रकांत खैरे, राज्यमंत्री अर्जून खोतकर, विधानपरिषदेत पक्षाच्या प्रतोद डॉ नीलम गोऱ्हे, विधान परिषदेत शिवसेनेचे गटनेते अनिल परब, खासदार अनिल देसाई आहेत. 


नेतेपदासाठी सध्या मातोश्रीवर जोरदार लॉबिंग सुरू झालंय.  अॅड बाळकृष्ण जोशी यांना मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. येत्या जानेवारी महिन्यात ही प्रक्रिया करण्यात येणार आहे.