Maharashtra : अमित ठाकरे यांना मंत्रीपदाची ऑफर, पाहा राज ठाकरे काय म्हणाले?
MNS News : राज्यात अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहे. आता मनसेचे युवा नेते अमित ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यांचा दौरा सुरु असताना एक बातमी येऊन धडकली ती म्हणजे...
मुंबई : MNS News : राज्यात अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहे. आता मनसेचे युवा नेते अमित ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यांचा दौरा सुरु असताना एक बातमी येऊन धडकली ती म्हणजे ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्री होणार म्हणून ! परंतु अमित ठाकरे यांच्या मंत्रीपदाबाबत मनसेकडून तात्काळ प्रतिक्रिया आली आहे.
राज्याच्या राजकारणात अनेक रंजक घडामोडी पाहायला मिळत आहेत. भाजपकडे जास्त आमदार असतानाही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना भाजपने मुख्यमंत्री पद दिले. भाजपने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याऐवजी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आता तर शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना संधी मिळू शकते, अशी माहिती समोर आली. मात्र, राज ठाकरे यांनी याबाबत माहिती देताना असं काही नाही, असे सांगून यावर पडदा टाकला आहे.
उपमुख्यंत्री देवेंद्र फडवणीस यांनी बहुमत ठरावात भाजपला मदत करावे, असे आवाहन केले होते. त्यांनी राज ठाकरे यांना फोन केला होता. त्यानंतर भाजपच्या बाजुने मनसेनेने मतदान केले. त्यामुळे भाजप आपल्या कोट्यातून मनसेला (MNS) एक मंत्रिपद देईल, अशी जोरदार चर्चा सुरु झाली होती. त्यासाठी साहजिकच मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, आता भाजपने मनसेला नवी ऑफर दिल्याची चर्चा होती. त्यानुसार, शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात अमित ठाकरे यांना मंत्रिपद मिळू शकते. मात्र, आज राज ठाकरे यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. असं काहीही होणार नाही, असे राज म्हणाले. तशी माहिती त्यांनी 'झी 24तास'ला दिली.