मुंबई : राज्यातील फडणवीस सरकार आपल्या मंत्रिमंडळातील भ्रष्टाचारी मंत्र्यांची पाठराखण करायचे सोडून प्रकाश मेहता यांचा राजीनामा घेणार का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला आहे. तसेच मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांची अशीच निःपक्षपाती चौकशी होणार का ? आणि दोषी आढळल्यानंतर आता कारवाई करणार का, असे प्रतिआव्हान जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसआरए घोटाळ्यात प्रकाश मेहता दोषी असल्याचा अहवाल लोकयुक्तांनी दिला आहे. त्यावर बोलताना जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच याबाबत ट्विट करताना मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशी आधीच मेहतांना क्लीन चिट दिली होती. मात्र चौकशीमुळे सत्य समोर आले आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.



एसआरए घोटाळ्याच्या चौकशीची मागणी वारंवार विधानसभेत लावून धरली असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले. अखेर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. आज चौकशीनंतर घोटाळा उघडकीस आला आहे. आता कारवाई करणार का, असे सवाल विचारला आहे.