मुंबई :  ओबीसी आरक्षणावरुन टीका करणाऱ्या विरोधकांना उत्तर देताना मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलं आहे. सर्व देशात ओबीसींचे आरक्षण धोक्यात आलंय. अध्यादेश काढून या निवडणुका पुढे ढकलता येतील का यावर विचार करतोय, असं मदत व पूर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. माझ्या राजीनाम्याने हा प्रश्न सुटणार आहे का? हा माझा प्रश्न येत नाही. हा संपूर्ण प्रश्न ग्रामविकास विभागाशी येतो, असं वडेट्टीवार म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या या परिस्थितीला भाजपा जबाबदार आहे, महाविकास आघाडी किंवा काँग्रेस नाही असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. सर्व पक्षांचं एकमत घेऊनच निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय सर्व पक्षांच्या संमतीने घेतला जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे. पाच जिल्ह्याच्या मुद्द्यावरून जे काही राजकीय आकांडतांडव सुरू आहे ते केवळ राजकीय फायदा मिळवण्यासाठी सुरू आहे, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहे. 


रिक्त जागांवर ओबीसी उमेदवार द्यावा ही सर्वांची भूमिका आहे. आम्हीही घोषणा केली आहे. सर्वांनीच ठरवल्याने ओबीसी विरुद्ध ओबीसी अशीच निवडणूक होणार आहे. ओबीसी विरुद्ध ओपन होणार नाही असं सांगतानाच वडेट्टीवार यांनी महाराष्ट्रातील जनता योग्य निर्णय घेईल. त्यावरून कळेल कुणाची चूक आहे, असा दावाही केला आहे.