मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दररोज होणारी रुग्णवाढ कमी होत आहे. परंतु अद्यापही काही जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढ कमी झालेली नाही. राज्यात लावण्यात आलेला लॉकडाऊन १५ मे पर्यंत असणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तो आणखी वाढवण्यात येणार की संपणार? याबाबत राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य मंत्रिमंडळाच्या आज होणार्‍या बैठकीत राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील कोरोनाची रुग्ण संख्या कमी होऊ लागली आहे. 


मात्र काही जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढ कमी होताना दिसत नाही. त्यामुळे १५ दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवावा अशी मंत्र्यांची भूमिका आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे.


त्याचबरोबर मंत्रीमंडळ बैठकीत १८-४४ वयोगट लसीकरण थांबवण्याबाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे. 


केंद्र सरकारकडून योग्य प्रमाणात लस उपलब्ध होत नसल्याने, जी लस उपलब्ध होत आहे ती ४५ च्या पुढील वयोगटासाठी द्यावी अशी सरकारची भूमिका आहे.