मुंबई : पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला असल्यामुळे लोकांना प्रतीक्षा आहे ती थंडीची. मात्र अद्याप वा-याची दिशा ही नैऋत्य-ईशान्य अशीच आहे. त्यामुळे गोव्यात अजून परतीचा पाऊस पोहोचलाच नाही.. शिवाय उत्तरेहून सुटणारा गार वाराही मिळाला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकूणच ऋतुचक्रातच आमुलाग्र बदल व्हावा अशी परिस्थिती असून, वेळेवर मान्सूनचे आगमन, वेळेवर मान्सूनचे परतणे आणि वेळेवर देशातून हटणे या गोष्टी तर अलिकडील ८ वर्षांत झालेल्या नाहीत. 


गोव्यात १ जूनला होणारं पावसाचे आगमन ८ जून नंतर होत आहे आणि १ सप्टेंबरला राजस्थानहून परतणारा पाऊस आता १५ सप्टेंबरनंतर परतीचा प्रवास सुरू करतोय. त्यामुळे तो गोव्यातही उशिरा पोहोचतो आणि देशातून पूर्णपणे हटण्यासाठीही विलंब लागतो. 


त्यामुळे ऑक्टोबर महिना संपायला आला तरी हिवाळा लागल्याच्या खाणाखुणाही दिसत नाहीत. हे सर्व मान्सून पुढे न सरकल्यामुळे होत असल्याचा हवामान खात्याचा निष्कर्श आहे.