मुंबई : Maharashtra Winter Session : विधिमंडळाचं अधिवेशन वादळी होणार याची झलक पाहायला मिळाली आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानमंडळाच्या पायऱ्यावर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी सरकारला विविध मुद्द्यांवर घेरण्याची विरोधकांनी रणनीती आखली.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिकविम्या शेतकऱ्यांना रक्कम न मिळणे, वीज कनेक्शन कट करणे, परीक्षेतली पेपर फुटी, एसटी संप, भ्रष्टाचार रॅकेट अशा विविध मुद्द्यांमुळे राज्याचं विधिमंडळ अधिवेशन चांगलंच गाजत आहे. विरोधकांनी सरकारवर प्रश्नांची सरबती केली.


दरम्यान, मुख्यमंत्री या अधिवेशनाला उपस्थित राहतील का याचीही उत्सुकता होती. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनाला आले नसल्यानी विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला. यामुद्द्यावरु सरकारला घेरले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष लक्षवेधी आज मांडली आहे. यावर सरकारने काय उत्तर देते याकडे लक्ष आहे. 



दरम्यान कर्नाटकातील पुतळा विटंबना प्रकरणाबाबत सरकारही निषेध प्रस्ताव मांडत विरोधकांची कोंडी करण्याची शक्यता आहे. यामुळे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे. आरोग्य विभाग आणि म्हाडा भरती परिक्षेत झालेल्या पेपरफुटीची सीबीआय चौकशी करण्याची मागणी भाजपने केली आहे. शेतकऱ्यांचा वीज पुरवठा बंद केला जात असल्याबद्द्लही भाजपने राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.