मुंबई : एका ट्रॅफिक हवालदाराला महिलेने मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिला आणि तिच्या साथीदाराला अटक केली. LT. मार्ग पोलीस स्थानकाच्या हद्दीत एका वाहतूक पोलिसाला महिलेनं मारहाण केली आहे. सादविका तिवारी असं या महिलेचं नाव आहे. महिलेसोबत मोहसीन खान नामक व्यक्तिलाही अटक केलीये. वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं महिलेवर कारवाई करताना त्या महिलेनं वाहतूक पोलिसावर हात उचलला. वाहतूक पोलसाने अपशब्द वापरल्याचा दावा या महिलेने केला आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतल्या नागपाड्यातील कॉटन एक्सचेंज नाक्यावर एका महिलेची पोलिसांशी ही अशी दादागिरी सुरू होती. सादविका तिवारी नावाची ही महिला मोहसीन खानसोबत विनाहेल्मेट बाईकवर जात होते. या दोघांनाही पोलिसांनी अडवलं. त्यांना दंड भरण्यास सांगितला. दंड भरण्याऐवजी सादविकानं पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली. तिने कर्तव्यावर असलेल्या पोलीस हवालदारांना मारहाण केली. या प्रकरणी सादविका आणि मोहसीनला अटक केली.


पोलिसाने महिलेला शिवी दिल्याचा आरोप होत आहे. या आरोपाचीही चौकशी करणार असल्याचं पोलिसांनी सांगितले. पोलिसाची कॉलर सोडावी अशी विनंती महिला पोलीस करत असतानाही आरोपी महिला तिचं ऐकत नव्हती. कायदा हातात घेणाऱ्या या महिलेला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे.