मुंबई : विरारमध्ये १९  वर्षांच्या तरुणीला चालत्या लोकलमधून फेल्याची घटना  घडली आहे. यात ती गंभीर जखमी झालेय. तिला तातडीने उपरासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. दरम्यान, पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षितेचा मुद्दा ऐरणीवर आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोमल चव्हाण हीला चालत्या लोकलमधून फेकण्यात आले.  गुरुवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास  कोमल कामावरून  नालासोपारा येथे घरी जात असताना ही घटना  घडली. कोमल महिलांच्या डब्यात बसली होती. लोकल सुरु होताच एक अनोळखी व्यक्ती त्या डब्यात चढली आणि कोमलकडे पैसे मागू लागली. मात्र, कोमलने नकार दिला असता तिला चालत्या गाडीतून खाली फेकून दिले.


कोमलवर विरार येथील एका रुग्णालयात उपचार सुरु आहे.  तिच्या  खंद्याला  जबर दुखापत झाली असून  खांद्यावर  शास्र्क्रिया करण्यात आली आहे आहे. तर ढोपरालाही खूप लागलेय. विशेष म्हणजे ज्या  वेळी कोमल महिलाच्या डब्यात चढली त्यावेळी ती एकटीच होती आणि  आणि डब्यात  पोलीस कर्मचारी देखील  नव्हता.


गाडीतून फेकून देणारी व्यक्ती फरार असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजची माहिती घेत आहे. त्यानुसार त्याचा शोध सुरु आहे.