मोठी बातमी! धनंजय मुंडे यांना धमकी देणारी महिला ताब्यात, पाहा कोण आहे ती महिला?
5 कोटी कॅश आणि 5 कोटींच्या दुकान द्या, नाहीतर... दिली होती धमकी
मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांना एका महिलेनं बलात्काराची तक्रार करण्याची धमकी देऊन खंडणी मागण्यात आलीय. फेब्रुवारी ते मार्च महिन्यात सदर महिलेने आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन करून 5 कोटी कॅश आणि 5 कोटींच्या दुकानाची मागणी केली होती. हे न दिल्यास समाजमाध्यमांवर बदनामी करण्याची धमकी मुंडेंना देण्यात आली होती.
तसंच सोशल मीडियावरुन बदनामी करुन तुमचं मंत्रीपद घालवेन अशी धमकीही या महिलेने दिली होती. याप्रकरणी धनंजय मुंडे यांनी मुंबई क्राईम ब्रँच मध्ये धाव घेत सदर महिलेविरुद्ध खंडणी मागीतल्याची तसेच ब्लॅकमेलिंग करत असल्याची पुराव्यांसह तक्रार दिली.
या महिलेचं नाव रेणू शर्मा असल्याचं समोर आलं असून रेणू शर्मा (Renu Sharma) ही परदेशातील नंबर वापरुन मेसेज, व्हॉट्सअॅप तसंच फोन करुन पैशाची मागणी करत होती, असं धनंजय मुंडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
सदर रेणू शर्मा ही महिला मूळ इंदूर मध्य प्रदेशातील आहे, रेणु शर्मावर इतर अनेक व्यक्तींनीही ब्लॅकमेलिंग संदर्भातल्या तक्रारी यापुर्वी अनेकदा विविध पोलीस ठाण्यात दाखल केल्या आहेत.