महिलेने गुप्तांग कापलेल्या ‘त्या’ तरुणाचा अखेर मृत्यू
तिने तुषारला धडा शिकवण्यासाठी नांदिवली टेकडीच्या निर्जन परिसरात नेले.
मुंबई: काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत छेड काढत असल्याच्या रागातून एका संतप्त महिलेने एका तरुणाचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना घडली होती. या तरुणाचा अखेर मृत्यू झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून मुंबईच्या जेजे रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते.
२५ डिसेंबर रोजी नांदिवली परिसरात एका महिलेने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने तुषार पुजारे या तरुणाचे गुप्तांग कापले होते. या घटनेने डोंबविलीत मोठी खळबळ उडाली होती. तुषार पुजारे नेहमी या तरुणीची छेड काढायचा. माझे तुझ्यावर प्रेम आहे. ही गोष्ट मी तुझ्या पतीलाही सांगेन, अशी धमकीही तो द्यायचा. या त्रासाला तरुणी कंटाळली होती. अखेर तिने तुषारला धडा शिकवण्यासाठी नांदिवली टेकडीच्या निर्जन परिसरात नेले. याठिकाणी आल्यानंतर या महिलेने प्रतिक केनिया आणि तेजस म्हात्रे यांच्या मदतीने त्याचे गुप्तांग कापले होते. यानंतर पुजारेला डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, या घटनेनंतर मानपाडा पोलिसांनी महिलेसह प्रतिक केनिया आणि तेजस म्हात्रे यांना अटक केली होती.