मुंबई : मंत्रालयात पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला. एका महीलेने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन उडी घेतली. मात्र सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या जाळीवर ही महिला पडली आणि पोलीसांनी तातडीने तिला बाहेर काढलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


प्रियंका गुप्ता असे या महिलेचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. ती महिला उल्हासनगर येथे राहत असून त्यांचा ज्यूस सेंटरचा व्यवसाय आहे. रात्री सर्व दुकान बंद असताना यांचा स्टॉल सुरु असल्याचे पाहून पोलिसांनी तिच्या नवऱ्यावर कारवाई केली. पोलिसांनी स्थानकात त्याला जबर मारहाण केल्याचा तिचा आरोप आहे. उल्हासनगर पोलीस ठाण्यात ही मारहाण झाल्याची तक्रार ती घेऊन आली आहे.