मुंबई : आशियातला सर्वात मोठा कॉलेज फेस्टिव्हल ही ओळख आहे आयआयटी मुंबईच्या मूड  इंडिगो फेस्टिवलची. या फेस्टिव्हलमधल्या एका कलाकृतीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे. 


तब्बल पंचवीस फूट किल्ल्याची प्रतिकृती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कागदाच्या कपांपासून बनवलेल्या तब्बल पंचवीस फूट किल्ल्याची एक प्रतिकृती मूड इंडिगोमध्ये साकारण्यात आली आहे. जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचा माजी विद्यार्थी चेतन राऊत यानं ही प्रतिकृती साकारली आहे. 


साठ हजाराहून अधिक कपांचा वापर


यासाठी चेतन राऊतनं तब्बल साठ हजाराहून जास्त कागदांचे कप वापरले आहेत. विशेष म्हणजे चेतन राऊत याचा हा दुसरा वर्ल्ड रेकॉर्ड आहे.