मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकरा (Maharashtra Vikas Aghadi) गंभीर आरोप असलेले गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना पाठिशी घालत आहेत. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनाही चुकीची माहिती दिली गेली. त्यानुसार ते बोलले आहेत. ही बाब गंभीर आहे. तसेच पुरावे असलेला पेन ड्राइव्ह माझ्याकडे आहे. माझ्या हातातील पेन ड्राइव्हमध्ये सगळे पुरावे आहे, असा असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. अनिल देशमुख हे १५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी रोजी होम क्वारंटाइन नव्हते, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांची गाडी जप्त करण्यात आली. यात सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. एटीएसनेही काहीजणांना अटक केली. यातच माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर 100 कोटी वसुलीचा आरोप केला. ते सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. पण, शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, सिंग यांचे दावे तथ्यहिन आहेत. कारण देशमुख त्यावेळी क्वारंटाइन होते, असे फडणवीस म्हणाले.



गृहमंत्री अनिल देशमुखांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलाय असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. अनिल देशमुखांच्या दौऱ्याची पूर्णपणे माहिती आपल्याकडून असून शरद पवारांना चुकीची माहिती दिली गेली. अनिल देशमुख क्वारंटाईन होते हा दावाही फडणवीसांनी खोडून काढलाय. 15 ते 27 फेब्रुवारी दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख अनेकांना भेटले, असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केलाय. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी फोन ट्रॅपिंगचा पेन ड्राईव्हही सादर केला. या संपूर्ण प्रकरणाबाबत संध्याकाळी दिल्लीत गृह सचिवांची भेट घेऊन सीबीआय तपासाची मागणी करणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.