भारत आणि न्यूझीलंडदरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची (ICC World Test Championship Final)  फायनल सुरु आहे. पहिल्या डावात भारतीय संघ मोठ्या धावा करु शकला नाही. संघ 217 धावात ऑलआऊट झाला. पण याचं फारसं टेन्शन भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या चेहऱ्यावर दिसलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भर मैदानात विराटचा भांगडा
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली फिल्डिंगदरम्यान मस्तीच्या मूडमध्ये दिसला. न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील पाचव्या षटकात स्टेडिअमच्या प्रेक्षक गॅलरीतून ढोल वाजल्याचा आवाज येऊ लागला. यावर विराट कोहलीने चक्क भर मैदानातच भांगडा सुरु केला. यामुळे मैदानातलं वातावरणही काळा काळासाठी आनंदी झाल्याचं पाहिला मिळालं.



विराटच्या भांगडावर चाहते खुश
विराट कोहलीच्या डान्सचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. भारतीय कर्णधाराच्या या डान्सला चाहत्यांनीही पसंती दिली आहे.