मुंबई : येत्या २०१९ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये नाराज असलेल्या माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय मंचाच्या बैठकीला भाजपमधील असंतुष्टांना बळ देण्याची रणनीती काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आखल्याचे बोलले जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजेच पर्यायानं भाजपचा पराभव  करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रमंच या व्यासपीठाची दुसरी बैठक आज मुंबईत पार पडली. दादर येथे झालेल्या बैठकीला राजकारण, समाजकारण, कायदा, सामाजिक संस्था, पत्रकारितासह ग्लॅमर क्षेत्रातील ४० नामवंत व्यक्तींनी उपस्थिती लावली होती.


मोदी-शाह यांच्या विरोधात उघड बंड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदी मुक्त भारत हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवत देशातील न्यायव्यवस्था, संविधान आणि लोकशाहीचे स्वातंत्र्य अबाधित राखणं यादृष्टीने या बैठकीत महत्वाची चर्चा करण्यात आली. देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपमध्ये मोदी-शाह यांच्या विरोधात उघड बंड पुकारलेल्या यशवंत सिन्हा यांनी या बैठकीचे अध्यक्ष स्थान भूषविले. येत्या १ मे रोजी राष्ट्रमंचच्या माध्यमातून पुरोगामीत्व मोर्चा कोल्हापूरमध्ये काढण्यात येणार आहे. ७ मेला अकोल्यात शेतकरी सभा तर त्यानंतर काही दिवसांत मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानात जाहीर सभेचे आयोजन या राष्ट्रमंच व्यासपीठ करणार आहे.


आज बैठकीत मुंबईतील पदाधिकाऱयांची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. मोदी-शाह यांच्या पराभवासाठी  सर्व संघटना तसेच राजकीय पक्षांनी आपले मतभेद बाजूला ठेऊन एकत्र येण्याचं आवाहन बैठकीला उपस्थित मान्यवरांनी केलं.


काय झालं नेमकं बैठकीत


- यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात स्थान झालेल्या राष्ट्रीय मंचाची दुसरी बैठक आज मुंबईत चैत्यभूमीजवळ पार पडली
- संविधानाला आणि लोकशाहीला निर्माण झालेला धोका आणि जातीय विद्वेषाशी परिस्थिती यावर चर्चा झाली
- महाराष्ट्रातील कार्यक्रम आजच्या बैठकीत ठरवण्यात आला
- कोल्हापूर, अकोला आणि मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलन आणि सभा घ्यायचं ठरलं
- कोल्हापूरचा मोर्चा - १ मे ला पुरोगामीत्व वाचवा यासाठी सर्वपक्षीय मोर्चा असेल. पानसरे यांची हत्या झाली तिथून शाहू महाराजांच्या पुतल्यापर्यंत असेल
- ७ मे ला अकोला येथे शेतकऱ्यांचा मोर्चा
- ऑगस्ट क्रांती मेदनाता सभा घेणार. याची तारीख अजून ठरलेली नाही
- या मंचाच्या माध्यमातून सर्वपक्ष मोदी हटाव नारा देत मात्र राजकीय महत्वाकांक्षा बाजूला ठेऊन एकत्र येतील
- जनतेचच्या मनावर प्रभाव टाकणारी मीडिया, ज्यूडीशियरी, महत्वाच्या संस्था या सरकारने ताब्यात घेतल्या आहेत. याविरोधात मंच कार्यक्रम हाती घेणार