मुंबई: रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादल्यामुळे अडचणीत आलेल्या YES बँकेच्या (Yes Bank) ग्राहकांना दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. Yes बँकेचे ग्राहक आता ATM मधून पूर्वीप्रमाणे पैसै काढू शकणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने गुरुवारी येस बँकेवर स्थगिती प्रस्ताव आणल्याने या बँकेतील ग्राहकांना महिन्याला फक्त ५० हजार रुपये काढता येऊ शकणार आहे. तसेच या निर्बंधांमुळे yes बँकेच्या डिजिटल सेवाही ठप्प झाल्या होत्या. तसेच ATM मधूनही ग्राहकांना पैसे काढता येत नव्हते. त्यामुळे yes बँकेच्या ग्राहकांची चांगलीच कोंडी झाली होती. परिणामी yes बँकेच्या अनेक शाखांबाहेर लोकांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या येस बँकेत १९१ कोटींच्या ठेवी, पेच निर्माण


मात्र, आता yes बँकेकडून ATM सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. बँकेकडून ट्विट करून तशी माहिती देण्यात आली. yes बँकेचे डेबिट कार्डधारक येस बँक आणि अन्य बँकांच्या ATMमधून पैसे काढू शकतात. तुम्ही दाखवलेल्या संयमासाठी आभारी आहोत, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. 


बुडत्या Yes Bankला स्टेट बँकेचा आधार


दरम्यान, येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना रविवारी पहाटे अटक करण्यात आली. अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) शुक्रवारी रात्री राणा कपूर यांच्या घरावर छापा टाकला होता. यानंतर काल (रविवारी) त्यांना चौकशीसाठी 'ईडी'च्या कार्यालयात पाचारण करण्यात आले होते. तब्बल ३० तास त्यांची कसून चौकशी झाली. रविवारी पहाटेपर्यंच ही चौकशी सुरु होती. यानंतर अधिक तपासासाठी अंमलबजावणी संचालनालयाने त्यांना अटक केली. आज सकाळी ११ वाजता 'ईडी'कडून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल.