बाराव्या मजल्यावरून उडी टाकत तरुणानं संपवलं जीवन
मुंबईतील उच्चभ्रू परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडालीय.
मुंबई : मुंबईतील उच्चभ्रू परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडालीय.
करण थॉमस जोसेफ असं या तरूणाचं नाव असून तो म्युझिशियन होता. करण हा मूळचा बँगलोरचा असून तो वांद्र्यातील बँड स्टँड येथील कोंकोर्ड या इमारतीतील १२ व्या मजल्यावर राहात होता.
शनिवारी सकाळी त्याचे मित्र त्याच्यासोबत होते. सकाळी पावणे नऊच्या सुमारास सर्व मित्र एकत्र बसलेले असताना अचानक त्याने खिडकीतून उडी मारली. करणला दारुचं व्यसन असून शुक्रवारी रात्रीपासून तो दारू पीत असल्याचं समोर आलंय.
पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ पोहचत मृतदेह ताब्यात घेतला आणि शव विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवलाय. करणने १२ व्या मजल्यावरून उडी का मारली? याचा तपास पोलीस करत आहेत. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.