Zee 24Taas Impact: मरोळच्या आर्या गोल्ड कंपनीने 'नो महाराष्ट्रीयन' असा ठळक उल्लेख करत मॅनेजरच्या रिक्त पदाची जाहिरात प्रसिद्ध केली होती. झी 24 तासने सर्वप्रथम ही बातमी उजेडात आणली. यानंतर विविध स्तरातून आक्रमक प्रतिक्रिया येऊ लागल्या. मनसे नेते राजू पारते यांनी 'आर्या गोल्ड'कंपनीच्या मालकाची भेट घेऊन त्याला खडसावले. बंटी रुपरेना असे या अमराठी मालकाचे नाव आहे. 'नो महाराष्ट्रीयन'असा इंग्रजीमध्ये स्पष्ट उल्लेख करणाऱ्या कंपनीने मराठीत आपला माफिनामा जाहीर केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि संपूर्ण महाराष्ट्राला उद्देशून त्याने ही माफी मागितली आहे. मी बंटी रुपरेना,आर्या गोल्ड कंपनीचा मालक आपल्या सर्वांची माफी मागतो, असे त्याने म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर्या गोल्ड कंपनीकडून मॅनेजर पदासाठी देण्यात आलेली जाहिरात शिकाऊ मुलीने पोर्टलवर अपलोड केली. यावेळी तिच्याकडून चुकून नॉन महाराष्ट्रीयन असा उल्लेख केला गेला. यामध्ये आम्ही लगेच सुधारणा केली आणि तो शब्द लगेच हटवण्यात आल्याचे मालक बंटी रुपरेनाने म्हटले. यामध्ये कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. झालेल्या प्रकाराबाबत मी मालक या नात्याने सर्व महाराष्ट्राची माफी मागतो, असे बंटी रुपरेनाने आपल्या माफिनाम्यात म्हटले आहे.  हा माफिनामा सोशल मीडियात चर्चेत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून याप्रकरणावर संताप व्यक्त केला जात आहे. 


मुंबईत काम करण्यासाठी अमराठी हवाय! ज्वेलर्सची संतापजनक जाहिरात; फोन केल्यावर म्हणाले...


पाहा माफिनामा




काय म्हणाले विजय वडेट्टीवार?


अशा कंपन्या सरकारचं जुमानत नाही. कायदा नसेल आणि नियम असेल तर नियमांची ऐसी तैसी करून मनाला वाटेल तसं काम करतात. याची तात्काळ दखल सरकारकडून घेतली गेली पाहिजे. एकही महाराष्ट्राबाहेरचा माणूस त्या कंपनीत कामाला लागता कामा नये. देशातील लोकं मुंबईत शिकायला येतात. शिक्षण संस्था अनेक या महाराष्ट्रात आहेत. पण नोकरीत तुम्ही बाहेरच्या लोकांना प्राधान्य देताय. पण या कंपनीची बेईमानी दिसून येते, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार असल्याचं देखील वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. तसेच आर्या गोल्ड कंपनीवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी देखील त्यांनी केलीये. महाराष्ट्रात अशी हिंमत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. 


मराठी माणसाला नोकरी नाकारणाऱ्या 'आर्या गोल्ड'च्या मालकाने मागितली माफी 


ठाकरे गटाकडूनही टीका 


दरम्यान, मुंबईत मराठी माणसाला नोकरी नाकारण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाने केली आहे. शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. माजी नगरसेवक प्रमोद सावंत यांनी कंपनीत घुसून मालकाला झापलं. अनावधानाने चूक झाल्याचे मालक बंटी रुप्रेजा यांनी मान्य केलं आहे. पुन्हा असा प्रकार घडल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा देखील प्रमोद सावंत यांनी दिला आहे.


'एवढी हिंमत! गुन्हा दाखल करा', मराठी उमेदवारांचा अर्ज नाकारणाऱ्या कंपनीवर विजय वडेट्टीवार यांची टीका