सायबर भामट्यांकडून तुमच्या डीमॅट अकांऊटवर डल्ला? हॅकर्सकडून अशी होते अफरातफर
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराला सावध करणारी ही बातमी आहे.
मुंबई : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराला सावध करणारी ही बातमी आहे. तुमच्या सायबर चोरांकडून तुमचे डीमॅट अकांऊट हॅक करून गैरव्यवहार केले जात आहे. (zee 24 taas investigation report know cyber fraudes how to cheated to d mat account holders)
डीमॅट अकाऊंटमध्ये कुणाचे पैसे वैगरे नसतात..तिथं असतात तुमचे शेअर्स, तेही इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये..त्यामुळे नुसतं डिमॅट अकाऊंट हॅक करुन हॅकर्सचा काहीच फायदा होऊ शकत नाही. मग हे दरोडेखोर नेमकं तुमच्या डिमॅटवर डल्ला मारुन काय करतात हे ही जाणून घेऊया.
डीमॅट अकांऊटमध्ये अफरातफर कशी होते?
1) डीमॅटच्या दरोडेखोरांना तुमच्या डिमॅट अकाऊंटच्या नाड्या सापडल्या, की ते सगळ्यात आधी शेअरमध्ये अफरातफर करतात.
2) तुमच्या खात्यातले सगळे मोठ्या कंपन्यांचे शेअर विकले जातात. आणि तुमच्या नावे कमी किमतीचे आणि फारसे न चालणारे शेअर विकत घेतले जातात. म्हणजे आधी मोठ्या शेअर्सची विक्री आणि मग कचरा शेअर्सची खरेदी म्हणजे दुप्पट नुकसान..
3) तुमचे सर्व शेअर्स विकले जातात. त्यातून आलेल्या रकमेतून कमी किमतीचे पेनी स्टॉक्स विकत घेतले जातात. जेव्हा हे पेनी स्टॉक्स विकायची वेळ येते. ते कुणी विकत घेत नाही. त्यामुळे गुंतवणूकदारचं दुप्पट नुकसान होते.
4) डीमॅट अकांऊटमध्ये चांगले शेअर्स विकून मिळालेली फुकटची संपत्ती घेऊन हे सायबर दरोडेखोर बळी पडलेल्या माणसाच्या अकाऊंटवर ऑप्शन ट्रेडिंगही करतात. लाखो रुपयांचे आऊट ऑफ द मनी ऑप्शन विकून वरच्या किमतीला खरेदी केली जाते. या व्यवहारातला नफा सायबर दरोडेखोरांच्या खिशात जातो
पोलिसांकडून कारवाई
प्रकरण सायबर पोलिसांपर्यंत गेल्यावर आता कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी पाच आरोपी गजाआड केलेत. यापैकी तीन जण हे पूर्वी ब्रोकरेज कंपनीचे माजी कर्मचारी असल्याचं पुढे आलंय.
सायबर दरोडेखोरांनी केलेली ही दरोडेखोरी म्हणजे हिमनगाचं टोक आहे. कोरोनाच्या काळात फोफावलेलं ऑनलाईन ट्रेडिंग फॅड दिसते तितकं फायद्याचं नाही हेच यानिमित्तानं अधोरेखित होतंय. तेव्हा तुमची कष्टाची कमाई वाचवायची असेल तर वेळीच सावध व्हा.