मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आंदोलनाच्या आगीत तेल ओतण्याचं काम करू नये असं विधान राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. पाटील झी २४ तासच्या चर्चेत बोलत होते. महसूल मंत्र्यांच्या या विधानावर २४ तास.कॉम या पोर्टलने नेटकऱ्यांचा कौल घेतला. शरद पवार #मराठा आंदोलनाच्या आगीत तेल ओततायंत हा चंद्रकांत पाटील यांचा आरोप योग्य आहे का ? तुम्हाला काय वाटतं...? असा सवाल नेटकऱ्यांना विचारण्यात आला होता.पवार हे मराठा आंदोलनाच्या आगीत तेल ओतत आहेत असे अधिकांश लोकांना वाटत असल्याचे त्यातून समोर आले आहे. झी २४ तासच्या फेसबुक पेजवर आम्ही याबद्दलचा सर्व्हे केला. या सर्व्हेमध्ये तब्बल १४ हजार ४०० पेक्षा जास्त जणांनी मतदान केलं. यातल्या ६८ टक्के जणांनी पवार आगीत तेल ओतत असल्याचं म्हटलं तर ३२ टक्के लोकांना चंद्रकांत पाटील यांचा हा आरोप मान्य नाही. झी २४ तासच्या या जनमतकौलाला मोठा प्रतिसाद मिळाला. तब्बल १ लाख १६ हजार पेक्षा जास्त लोकांपर्यंत हा कौल पोहोचला आहे. 


रात्री ११.३० वाजताचा फोटो