मुंबई : रविवारची सकाळी मुंबईकरांसाठी विशेष आहे. झी बिझनेस या अर्थविश्वातल्या आघाडीच्या वृत्तवाहिनी आणि मुंबई स्टॉक इक्स्चेंजतर्फे मुंबईत बांद्रा कुर्ला काँम्प्लेक्स इथे बुल रनचं आयोजन करण्यात आले आहे. या बुल रनमध्ये साक्षी पवार या पहील्या क्रमांकाच्या महिला मानकरी ठरल्या. तर राजश्री साळुंखे या दुसऱ्या तर गीता राठोड यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


बीकेसीच्या ग्राऊंड नंबर १ इथून या रनला सुरूवात झाली. सहा किलोमीटरची ही रन असून या रनसाठी विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित आहेत.


या स्पर्धेसाठी जवळपास १५ हजारांहून अधिक मुंबईकर धावत आहेत.


राजकारण, अर्थविश्व, उद्योग जगत, फिल्म, शेअर मार्केट या क्षेत्रातले दिग्गज इथे उपस्थित आहेत. या रन आधी दिमाखदार रंगारंग कार्यक्रम झाला.